Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
BREAKINGNEWSSIGN.IN

Latest National & International Trending News

BREAKINGNEWSSIGN.IN

Latest National & International Trending News

  • Home
  • ABOUT Us
  • Birthdays list
  • Disavowal
  • Disclaimer
  • Contact
  • Home
  • ABOUT Us
  • Birthdays list
  • Disavowal
  • Disclaimer
  • Contact
Subscribe
Close

Search

Breaking News

पुण्यात भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर स्मृती समारोह व लता मंगेशकर वैद्यक रत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

By admin
February 9, 2026 3 Min Read
0

पुणे: भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या करुणामय वारशाला अभिवादन करण्यासाठी Lata Mangeshkar Medical Foundation तर्फे लता मंगेशकर वैद्यकरत्न पुरस्कार प्रदान समारंभ आज शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न झाला. या विशेष कार्यक्रमासोबत “संतवाणी आणि लता हृदय” हा भावपूर्ण सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

हा सोहळा मनिषा निश्चल्स मॕहेक कॉन्सर्ट्स यांनी Deenanath Mangeshkar Hospital & Research Center यांच्या सहकार्याने आयोजित केला होता. लता दीदींनी आयुष्यभर जपलेल्या सेवा, संवेदना आणि मानवतेच्या मूल्यांना अभिवादन करण्याचा हा एक भावनिक प्रयत्न ठरला. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांना भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर वैद्यक रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून, यावर्षी डाॅ. (प्रोफेसर) श्री. राजशेखरन, अध्यक्ष, गंगा हॉस्पिटल, कोइंबतूर, यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. विश्वनाथ कराड, संस्थापक – MIT Group of Institutions, हे उपस्थित होते. या सोहळ्याला भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. सुरेश तळवलकर, विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर, डॉ. धनंजय केळकर आणि डॉ. समीर जोग यांची मान्यवर उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती भागवत यांनी केले.

संगीत आणि सेवेला मानवंदना

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर वैद्यकरत्न पुरस्कार हा केवळ सन्मान नसून सेवाभावाचा गौरव ठरला. संगीताद्वारे हृदयांना स्पर्श करणाऱ्या लता दीदींच्या नावाने आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचा या निमित्ताने गौरव करण्यात आला.

“संतवाणी आणि लता हृदय”

हा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत कबीर, संत सूरदास आणि संत मीराबाई यांच्या अजरामर काव्यांवर आधारित होता. लता दीदींनी या संतवाणीला दिलेल्या स्वरांमधून प्रेरणा घेऊन साकारलेली ही संगीतांजली अत्यंत भावस्पर्शी ठरली.

कार्यक्रमाचा मुख्य सांस्कृतिक भाग म्हणजे “संतवाणी आणि लता हृदय” ही भक्तिमय आणि शास्त्रीय संगीतातील आदरांजली होती. या सादरीकरणात पं. हृदयनाथ मंगेशकर आणि विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर यांचे निरूपण झाले.

या कार्यक्रमात विभावरी जोशी, मनिषा निश्चल, श्रेयसी पावगी, प्राची देवल आणि ऋतुजा तारे या गायिकांनी सहभाग घेतला.

या संगीत अर्पणाबद्दल बोलताना पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले:

“संगीत हे दीदींसाठी प्रार्थना होती — जगाला दिलेले त्यांचे अर्पण. ‘स्वरांजली’मधून आपण त्यांच्या आवाजासोबत त्यांची साधना, शिस्त आणि प्रत्येक सुरातील पवित्रता स्मरली.”

सेवेचा वारसा पुढे नेताना

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि रिसर्च सेंटर मार्फत फाउंडेशनने अनेक वर्षांपासून अत्याधुनिक, संशोधनाधारित आणि सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्यसेवा पुरवली आहे. ही संस्था मंगेशकर कुटुंबाच्या सेवाभावी परंपरेचे जिवंत प्रतीक ठरली आहे.

लता मंगेशकर स्मृती समारोह हा केवळ स्मरणाचा कार्यक्रम न राहता सेवेला नवी दिशा देणारा प्रेरणादायी क्षण ठरला — जिथे संगीताने आत्म्याला स्पर्श केला आणि वैद्यकीय सेवांनी जीवनांना आशा दिली.

कार्यक्रमाची माहिती“संतवाणी आणि लता हृदय”

 

पुण्यात भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर स्मृती समारोह व लता मंगेशकर वैद्यक रत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Author

admin

Follow Me
Other Articles
Previous

Abhay Sinha President IMPPA And FFI Strongly Opposes DPIIT’s AI Copyright Proposal, Calls It A Threat To Cinema

Next

Pune Hosted Bharat Ratna Lata Mangeshkar Memorial Ceremony & Lata Mangeshkar Medical Awards Evening Honouring Her Legacy Of Compassion

Recent Posts

Recent Comments

No comments to show.

Archives

  • November 2026
  • October 2026
  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • November 2024
  • October 2024
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024
  • April 2024
  • March 2024
  • February 2024
  • January 2024
  • April 2023
  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • February 2021
  • January 2021
  • नवरत्न पांडे की आवाज में छठ का भक्तिमय संदेश, वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स ने रिलीज किया ‘उगी आदित भोर भइले’
  • देश के यशस्वी एवं जनप्रिय नेता, करोड़ों कार्यकर्ताओं के प्रेरणास्रोत, अद्वितीय संगठनात्मक क्षमता, कुशल रणनीतिक कौशल एवं दृढ़ नेतृत्व के प्रतीक, भारत सरकार के माननीय केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री अमित शाह जी से आज अहमदाबाद स्थित उनके आवास पर आत्मीय भेंट करने का सौभाग्य प्राप्त हुआ i
  • वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स भोजपुरी का छठ गीत ‘उगी हे सूरज देव’ रिलीज, प्रियंका सिंह की आवाज में छठी मईया की भक्ति
  • प्रेम सिंह और मणि भट्टाचार्या अभिनीत सुर म्यूजिक वर्ल्ड प्रा. लि. प्रस्तुत भोजपुरी फिल्म ‘रक्षा करिहा कुलदेवी माई’ का फर्स्ट लुक ऑउट
  • मनरंग LLP द्वारा आयोजित महाराष्ट्र श्री सम्मान समारोह धूम धाम से संपन्न हुआ
Copyright 2026 — BREAKINGNEWSSIGN.IN. All rights reserved. Blogsy WordPress Theme